भोजनातील हानिकारक संयोग - घरगुती उपाय

Latest

घरगुती उपाय मराठी,हिंदी आणि English मधून फळांचे ,भाज्यांचे घरगुती उपाय आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटतील .

Pages

Tuesday, September 15, 2020

भोजनातील हानिकारक संयोग


 भोजनातील  हानिकारक संयोग
  • दुधासोबत- दही , मीठ , आंबट वस्तू, चिंच, डांगर , मुळा , पाने, दोडकी , बेल, आंबट फळे, सातू, हानिकारक असतात. दुधात गुळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दूधा सोबत हानिकारक आहेत. 
  • दह्या सोबत- खीर, पनीर , दूध, गरम जेवण , केळी , डांगर (खरबूज ), मुळा इत्यादी घेऊ नये. 
  • तुपासोबत - थंड दूध, थंड पाणी व सम प्रमाणात मद्य हानिकारक असते.  
  • मद्या सोबत- मुळा , खरबूज , सम प्रमाणात तूप , द्राक्षे , पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात. 
  • फणसा  नंतर पान  खाणे हानिकारक असते. 
  •  मुळ्यासोबत- गूळ खाणे नुकसानदायक असते. 
  •  खिरी सोबत - खिचडी , आंबट पदार्थ, फणस व सातू घेऊ नये. 
  • गरम पाण्याबरोबर - मद्य घेऊ नये. 
  • थंड पाण्या बरोबर - शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभुळे, काकडी, गरम दूध किंवा गरम भोजन घेऊ नये.  
  • कलिंगडा बरोबर- पुदिना किंवा थंड पाणी घेऊ नये. 
  • चहा सोबत -काकडी , थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये. 
  • माशा सोबत- दूध , उसाचा रस, मध , पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.  
  •  मांसा बरोबर- मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.  
  • गरम जेवणा बरोबर - थंड जेवण व थंड पेय हानिकारक असतात.  
  • खरबूजा बरोबर- लसूण,  मुळा ,मुळ्याची पाने , दुध किंवा दही नुकसानकारक असते. 
  • तांबे पितळ किंवा कांशाच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तू उदा. तूप ,तेल , दही , ताक , लोणी, रसदार भाज्या ईत्यादी विषाक्त होतात.  अशा भांड्यांत बराच वेळ ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत.एल्यूमिनिम आणि प्लास्टिक च्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवण्याने , उकळल्याने किंवा खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.   

No comments:

Post a Comment

Popular Posts