
फणस
आंब्या नंतर कोकणात लोकप्रिय असलेलं फळ म्हणजे फणस . याचे मूळ स्थानही भारतातच आहे , इतकेच नव्हे तर अति प्राचीन असे हे फळ आहे . कारण याचा उल्लेख यजुर्वेदात आढळतो .
हे एक काटेरी मोसमी फळ असून विशेषतः किनारपट्टीलाच होते. आपल्याकडे कोकणात फणस चैत्र वैशाखात होतो तर काशी बनारसकडे हे फळ वर्षभर मिळते. याच्या दोन जाती आहेत . एक कापा दुसरा बरका (रसाळ ). पिकलेल्या फणसाचा घमघमाट इतका सुटतो कि खाण्याचा मोह अनावर होतो, एक वेळेस एकेका झाडाला ५००।५०० फळे धरतात.
फणसात गावरान फणस व विलायती फणस अशी आणखी जाती आहेत. शिवाय भाजीचा व खाण्याचा फणस असे आणखी दोन भेद आहेत .
काप्या फणसाचा गर कालवून पातळ व एकजीव करतात. याच्या पोळ्या (साठे ) करून वाळवून टिकवितात व पुढच्या मोसमा पर्यंत आठ महिने टिकतात .
कच्चा फणसाची (कुयरी ) भाजी करतात. ती अत्यंत चविष्ट बी रुचकर असते. हि भाजी पुष्टीकारक आहे.
गऱ्यातील आठळी (गोट्या ) पिष्ठमय , गोडसर व रुचकर असतात. आठळ्या उकडून , भाजून , भाजीत , उसळीत घालून अथवा त्याचीच भाजी करून आहारात घेतात.
- गऱ्यात साखरेचे प्रमाण भरपूर असते . तसेच गरा तुरट, जड , दाहकारक , पण बलकारक, मेदोवृद्धीकर , कफकारक, मांसक असा विविध गुणकारी आहे.
- बरक्या फणसाच्या गऱ्यात मैदा मिसळून पुऱ्या किंवा वडे करतात.
- फणसाचे फळावरील साल (चावरे, चारखणे ) गुरे आवडीने खातात . दुभत्या जनावरांना खावयास घातल्यास ती अधिक दूध देतात.
- कच्चा फणस किंवा त्याची साल ठेचून पिळून एक प्रकारचा चीक निघतो . तो पाण्यात विरघळतो , त्याचे चिकट लुकण (गोंद ) तयार होते . हा चीक रबरासारखा असतो. याने चिनी मातीची भांडी सहज सांधता येतात .
- दाढेला सूज ठणका असल्यास फणस आंबा (झाडास येणारी गाठ /बांडगुळ ) पाण्यात उगाळून बाहेरून लेप करावा. लाळ आल्यास थुंकून टाकावी.
- शक्तिवर्धनसताही रोज सकाळी ५ गरे खावे.
- भस्मक रोगात (सारखी खायखाय सुटणे. ) दोन तीन गरे आठवडाभर नेमाने खावेत , फरक पडतो.
- उलटी बरोबर रक्त पडत असल्यास दोन गरे खाऊन वर दूध प्यावे.
- वायूमुळे खोकला सुटल्यास ३।४ गरे ३ दिवस खावेत.
- लहान मुलांचे हागणीवर १० ग्रॅम पानांचा/ मुळांचा काढा करून थोडा थोडा तासातासाने द्यावा.
- खरूज ली असल्यास पण स्वच्छ धुवून आख्खे/ ठेचून बांधावी.
- खरजेवर पानाचा रस १ चमचा तूप घालून पोटांत द्यावा.
- कोणत्याही प्रकारच्या गाठीवर पानांचा रस व उसाचा शिरका एकत्र खलून लावावा.
- भाजलेल्या आठळ्यांचे ३ ग्रॅम चूर्ण दूध साखर घालून घेण्याने शुक्रवृद्धीवर म्हणून उपयुक्त ठरते.
- फणस आंबा /बांधे /बांडगुळ /आळंबीचा रस काढुन तोंड आले असल्यास त्यावर लावावे व लाळ थुंकून टाकावी.
- तोंड आले असता मोखा (डहाळीच्या टोकाचा कोवळा भाग ) वाटून त्याची गोळी करून तोंडात धरावी व लाळ थुंकून टाकावी.
No comments:
Post a Comment